ग्रामपंचायत विडणी

ग्रामपंचायतीविषयी

यशोगाथा

ग्रामपंचायत सुपने हि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात वसलेली स्वच्छ, सुंदर, स्मार्ट, हरित अशी ग्रामपंचायत आहे.

सुपने हे गाव सन १९७० पूर्वी कोयना नदीकाठी वसले होते परंतु सन १९६७ साली झालेल्या विनाशकारी भुकंपामुळे गाव बाचित झाले आणि त्यानंतर ते कराड- चिपळूण महामार्गालगत वसले. दक्षिणेस कोयना नदी व उत्तरेस असणारा कराड-चिपळूण महामार्ग या दोन्हींच्या मध्ये हे गाव वसले आहे. कोयना नदीमुळे मुबलक असे पाणी उपलब्ध असल्याने गावातील सर्व कुटुंबे शेती प्रधान आहेत. गावामध्ये आदर्श अशी ग्रामपंचायत इमारत असून यातून गावचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवला जातो. या सोबतच गावात स्वतंत्र तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, ग्रामसंघ, व्यायामशाळा, बाचनालय आदी इमारती आहेत.

सुपने गावात अत्यंत देखणी सुशोभित केलेली व सुसज्ज सभा मंडप असलेली श्री हनुमान, अंबाबाई, गणेश, सिद्धनाथ, केदारनाथ, जोतिबा, महादेव, इ. देवालये आहेत. श्री स्वा. सै. जगन्नाथराव पाटील, सभागृह मुलांसाठी व मुलींसाठी कुस्तीसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. गावामध्ये एकूण ६ अंगणवाड्या असून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. तसेच श्री केदार हायस्कूल सुपने हे चौथी ते दहावी हायस्कूल असून यामध्ये अंदाजे ४७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावामध्ये सर्व मंदिर परिसरात व रस्त्यालगत वृक्षारोपन करण्यात आलेले आहे. घंटागाडीद्वारे गावातील ओला व सुका कचरा संकलित केला जातो. ग्रामपंचायतीलगत प्लास्टीक संकलन केंद्र उभारले असून त्यामध्ये प्लास्टीक बॉटल, प्लास्टीक पिशव्या, ई-कचरा व ग्लास बॉटल्स स्वतंत्ररित्या संकलित केल्या जातात. गावातील सर्व घरे सार्वजनिक गटर्सना जोडले असून त्यातून वाहणारे सर्व सांडपाणी शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे सर्व सांडपाण्याचा पुर्नवापर केल्याने कोणताही पाणीसाठा दूषित होत नाही. स्वच्छ भारत मिशन व १५ वा वित्त आयोग यातून घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे.

सुपने गावामध्ये एकही दारूचे दुकान नसून दारूबंदी असलेले गावाला ह. भ. पं. श्री नावजी महाराज यांची संजीवन समाधी असून त्यास क वर्ग दर्जा प्राप्त झालेला आहे. या ठिकाणी वारकरी परंपरा असून दरवर्षी मोठ्या उत्साहात हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आयोजित केले जाते त्यात भजन, कीर्तन, प्रवचन आदी उपक्रम घेतले जातात. सुपने गावातील बहुतांश समाज उपयोगी कामे लोकसहभागातून केली जातात.

अशा प्रकारे सुपने गावची वाटचाल प्रगतीपथावर असून सर्व लोक गुण्यागोविंदाने एकत्रित येऊन गावच्या प्रगतीसाठी झटत असतात.

सुपने गावची वैशिष्ट्य

  • निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त
  • पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार प्राप्त
  • संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२३/२४ कराड तालुक्यात प्रथम क्रमांक
  • संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२३/२४ सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक
  • आर. आर. आबा पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धेत सहभाग
  • अंगणवाडी क्रमांक २५६ व २५८ आयएसओ मानांकीत अंगणवाड्‌या
  • श्री केदार हायस्कूल सुपने स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त
  • बहुतांश सार्वजनिक कामे लोकसहभाग व लोकवर्गणीतून केली जातात.
सरपंच कारकीर्द (स्थापना १३/९/१९५३)
अ.क्र.नावकालावधी
श्री.बाबा कृष्णा शिंदे१३/९/१९५३ ते ३१/९/१९५३
श्री.पिलू बंडू पाटील०१/०२/१९५३ ते २२/०७/१९५६
श्री.एस.ए.गुरव प्रशासक१/२/१९५६ ते २४/७/१९५७
श्री.मारुती कोंडी पाटील२५/७/१९५७ ते ३०/४/१९६०
श्री.श्रीपती शंकर सुतार११/४/१९६० ते १२/८/१९६१
श्री.शंकर कोंडी पाटील१३/८/१९६१ ते २८/१/१९६६
श्री.जगन्नाथ बयाजी पाटील२९/१/१९६६ ते १९/८/१९७०
श्री.शंकर कोंडी पाटील२०/८/१९७० ते ३०/५/१९७८
सौ.अनुसया बाळकृष्ण निकम३१/५/१९७८ ते ३१/५/१९८३
१०श्री.बजरंग शिवराम पवार१/६/१९८४ ते १९/११/१९९१
११श्री.दिनकर रामजी पाटील२०/११/१९९२ ते १९/११/१९९७
१२सौ.कुसुम शंकर पाटील१९/११/१९९७ ते १८/११/२००२
१३श्री.आनंदराव शंकर पाटील१९/११/०२ ते १८/११/०७
१४श्री.लालासाहेब अनंत पाटील१९/११/२००७ ते १/०२/२००९
१५श्री.प्रदिप शंकरराव थोरात०२/२/२००९ ते २२/०३/२०१०
१६श्री.चरण जयवंत पाटील२३/३/२०१० ते १२/०५/२०११
१७श्री.प्रदिप शंकरराव शिंदे१३/५/२०११ ते २९/०३/२०१२
१८श्री.सतिश अरुण पानुगडे२२/३/२०१२ ते १८/११/२०१२
१९सौ.मंगल उत्तम सुतार१९/११/२०१२ ते २४/६/२०१५
२०सौ.स्वाती अशोक माळी२५/६/२०१५ ते १८/११/२०१७
२१श्री.अशोक आबाजी झिंजे१९/११/२०१७ ते १८/११/२०२२
२२सौ. विश्रांती व्यंकटराव पाटील२०/१२/२०२२ (पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच)
स्वातंत्र्य सैनिक यादी (मौजे सुपने, ता. कराड)
अ.नं.नावशेरा
कै.जगन्नाथ बयाजी पाटीलस्वातंत्र्य सैनिक
कै.शंकर कोंडी पाटीलस्वातंत्र्य सैनिक
कै.भिकु धोंडी पाटीलस्वातंत्र्य सैनिक
कै.सखाराम नारायण पाटीलस्वातंत्र्य सैनिक
कै.रामचंद्र तुकाराम पाटीलस्वातंत्र्य सैनिक
कै.पांडुरंग रामा जाधवस्वातंत्र्य सैनिक
कै.तुकाराम जोती जाधवस्वातंत्र्य सैनिक
कै.जिजाबा रामजी पाटीलस्वातंत्र्य सैनिक
कै.शंकर पांडुरंग पाटीलस्वातंत्र्य सैनिक
१०कै.केशव दाजी चव्हाणस्वातंत्र्य सैनिक
११कै.ज्ञानु तुकाराम पाटीलस्वातंत्र्य सैनिक
१२कै.ज्ञानु बाळा पाटीलस्वातंत्र्य सैनिक
१३कै.ज्ञानदेव कृष्णा पाटीलस्वातंत्र्य सैनिक
१४कै.दिनकर कोंडी पाटीलस्वातंत्र्य सैनिक
१५सिद्धेश्वर सिताराम कुलकर्णीस्वातंत्र्य सैनिक
१६कै.बाबा कृष्णा शिंदेस्वातंत्र्य सैनिक
१७कै.शंकर बकाजी माळीस्वातंत्र्य सैनिक
१८कै.कोंडीबा रावजी पाटीलस्वातंत्र्य सैनिक

 

Scroll to Top