ग्रामपंचायत विडणी
प्रत्येक पाऊल प्रगतीकडे
विडणी गाव (ता. फलटण, जि. सातारा) हे ऐतिहासिक व प्रगतिशील गाव असून येथे शेती, शिक्षण आणि सामाजिक विकासाला विशेष महत्त्व दिले जाते. सुसज्ज पायाभूत सुविधा, ग्रामविकासाच्या विविध योजना आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे विडणी गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
माननीय मंत्री व पदाधिकारी

देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री

सुनेत्रा अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री

जयकुमार गोरे
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

योगेश कदम
माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

एकनाथ डवले
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
विभागीय आयुक्त (पुणे)

याशनी नागराजन
मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद सातारा)
ग्रामपंचायत पदाधिकारी

सरपंच
श्री. सागर कांतिलाल अभंग

उपसरपंच
सौ.मनिषा दिपक नाळे

ग्रामपंचायत अधिकारी
श्री. अंकुश निवृत्ती टेंबरे
विडणी गाव (ता. फलटण, जि. सातारा) हे ऐतिहासिक, समृद्ध आणि प्रगतिशील गाव म्हणून ओळखले जाते. येथील ग्रामस्थांची एकजूट, परंपरा आणि विकासाबद्दलची बांधिलकी ही गावाची खरी ओळख आहे. सुसज्ज पायाभूत सुविधा, आधुनिक योजना आणि शिक्षणाच्या माध्यमातून गाव प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विडणीकरांना आपल्या गावाचा अभिमान असून, “माझं गाव – माझा अभिमान” ही भावना प्रत्येकाच्या मनात दृढपणे रुजलेली आहे.

रूपरेषा अंकांमध्ये
फलटण तालुक्यातील विडणी हे मोठे गाव असून येथे २०८० कुटुंबांसह सुमारे १०,४३९ लोकसंख्या आहे; लिंग गुणोत्तर ९३४ असून बालसंख्या सुमारे ११.३७% आहे. गावाचा साक्षरता दर ८०.४४% असून पुरुष साक्षरता ८६.०८% व महिला साक्षरता ७४.४३% आहे.
एकूण लोकसंख्या
पुरुष
महिला
बालके
अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती
साक्षरता दर
कामगार लोकसंख्या
*जनगणना २०११ नुसार
लोकसहभागातून समृद्धीकडे
लोकसहभागाच्या बळावर विडणी गावात अनेक विकासकामे यशस्वीपणे पूर्ण होत असून गावाच्या प्रगतीला नवे बळ मिळत आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे सामाजिक, पर्यावरणीय आणि पायाभूत सुविधा अधिक सक्षम होत विडणी गाव समृद्धीकडे वाटचाल करत आहे.
पाणीपुरवठा व्यवस्था
नळयोजनेद्वारे गावातील सर्व घरांना नियमित, स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित केला जातो.

CCTV सुरक्षा
गावातील प्रमुख ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमुळे सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत व प्रभावी झाली आहे.

स्वच्छ व सुंदर गाव
स्वच्छता, वृक्षारोपण आणि लोकसहभागामुळे गाव स्वच्छ, हिरवेगार व सुंदर बनले आहे.

अंतर्गत रस्ते
गावातील अंतर्गत रस्ते पक्के व सुस्थितीत असून वाहतूक आणि दळणवळण अधिक सुलभ झाले आहे.

सुसज्य इमारती
गावात सुसज्ज प्रशासकीय इमारती असून त्यातून विविध शासकीय सेवा व कामकाज प्रभावीपणे पार पाडले जाते.

स्ट्रीट लाईट
गावातील सर्व रस्त्यांवर स्ट्रीट लाईटची व्यवस्था असून रात्री सुरक्षित व उज्ज्वल वातावरण निर्माण झाले आहे.

क्रीडांगणे व प्रशिक्षण
गावात क्रीडांगण व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असून युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन दिले जाते.

सुसज्ज शाळा
आधुनिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे गावातील शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम ठरते.

अक्षय ऊर्जा वापर
गावात अक्षय ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे.

ऑनलाईन पोर्टलद्वारे उपलब्ध सुविधा
तुमच्या ग्रामपंचायतीच्या वेबसाइटवर आता सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध! घरपट्टी भरण्यापासून ते जन्म-मृत्यू दाखला अर्जाच्या स्थितीपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा.
विडणी
सुसज्जित इमारती
आधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण, ग्रामपंचायतीच्या प्रभावी व कार्यक्षम व्यवस्थापनासाठी तयार इमारतींमध्ये नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. या इमारती केवळ प्रशासकीय कामकाजासाठीच नाहीत, तर त्या गावातील लोकांच्या गरजांसाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून उभ्या आहेत.
बातम्या व माहिती
ताज्या घडामोडी आणि उपयुक्त माहिती यांचे प्रभावी सादरीकरण. वाचकांपर्यंत सत्य, अचूक आणि वेळेवर माहिती पोहोचवण्यासाठी समर्पित विभाग.
आपली मते व अभिप्राय
आपले विचार आम्हाला सांगा – कारण तुमचा अनुभवच आमच्या प्रगतीचा मार्गदर्शक आहे.




